🌿 वृक्ष लागवड करून प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज
हॅलो जनता न्यूज, जामनेर :- “प्रकृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने अंगिकारली पाहिजे. वृक्षारोपण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आधीपासून असलेल्या वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज यांनी केले. आई भवानी देवराईत आयोजित वृक्षारोपण व ‘आई भवानी देवराई एक सचित्र वनगाथा’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी परिसरात हिरवाई…
