हॅलो राजकारण

Chatrapati sambhajinagar Loksabha : इलेक्टॉरल बॉन्डची गरज इतर राजकीय पक्षांना, आम्हाला नाही – एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी

हॅलो जनता (Chatrapati sambhajinagar Loksabha) – अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वैजापूर येथे आयोजित छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत केली आहे. भाजपाला हरवण्यासाठी आम्ही आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत आहोत. तेथील आमच्या समर्थक मतदारांनी त्यांना मतदान करावं अस आवाहन त्यांनी यावेळी केलं. तर दुसरीकडे जाहीर सभेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या विरोधात जोरदार टीका करत असताना वंचित आघाडीच्या विरोधात टिका करण्याच टाळल.

Chatrapati sambhajinagar Loksabha : एमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका करणे टाळले

मागील निवडणुकीत एमआयएम व वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होती. इलेक्ट्रॉल बाँडच्या मुद्यावर देशातील सर्वच पक्षांनी हजारो कोटी रुपये घेतले आहेत. बोली लावून पक्षांची विक्री झाल्याचे दिसते. ६ हजार कोटी रुपये एकट्या भाजपाला मिळाले. त्याखालोखाल इतर पक्षांना निधी मिळाला. एमआयएम पक्षाला ते विकत घेऊ शकले नाहीत. तर सर्व पक्षांना इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून पैसे मिळाले मात्र आम्हाला या बॉण्ड ची गरज नाही, आमचा जनतेसोबतचा बॉण्ड खूप चांगला आहे.

आता एक भाजपा, एक कॉंग्रेस, दोन शिवसेना व दोन राष्ट्रवादी यांच आवाहन या निवडणुकीत असले तरी स्वतंत्र विचारांचा आवाज म्हणून याही निवडणुकीत जनता आमचा उमेदवार निवडुन देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. छञपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी मागील पाच वर्षात काम करताना, येणारा माणूस कुठल्या धर्माचा किंवा जातीचा आहे हे न पाहता काम केलं. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा बेरोजगारीचा मुद्दा असेल इम्तियाज जलील यांनी संसदेत जनतेची प्रश्न योग्यरीतीने व अभ्यासपुर्वक मांडली त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा त्यांना संधी द्यावी व संसदेत आपला आवाज पाठवावा असे आवाहन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर सभेत केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Kolhapur Loksabha : महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Bjp Jalgaon: पक्षविरोधी वर्तन केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतून ‘या” पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button