हॅलो सामाजिक

राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; जळगाव रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात

जळगाव  प्रतिनिधी : जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन आज बहिणाबाई उद्यानासमोरील परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शहराच्या पायाभूत विकासाच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे महत्त्वाच्या टप्प्याच्या रूपात पाहिले जात आहे.

लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि अथक प्रयत्नांमुळे या विकासकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

भूमिपूजन कार्यक्रमास दीपक सूर्यवंशी, दीपमाला काळे, मनोज चौधरी, डॉ. चंद्रशेखर पाटील, नितीन लढ्ढा, प्रकाश बालाणी यांच्यासह नगरसेवक, भाजप पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार राजूमामा म्हणाले की, जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार आणि रुंद रस्त्यांचे जाळे उभारणे ही काळाची गरज आहे. रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ बनेल आणि शहराच्या आर्थिक व नागरी विकासाला नवी गती मिळेल. शहरातील विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून आणखी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रिंग रोड प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगत, काम उच्च दर्जाचे आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. भूमिपूजनानंतर उपस्थितांनी विकासकाम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रिंग रोड प्रकल्पामुळे भविष्यात जळगाव शहराच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याबरोबरच शहराच्या नियोजित विकासालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button