Headlines

🚨मंत्री सावकारे गावात गेले अन् शेतकऱ्यांनी… प्रचंड नुकसान

हॅलो जनता न्यूज, भुसावळ – वरणगाव परिसरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे, या भागातील भोगवतीला नदीला मोठा पूर आल्यामुळे या परिसरातील शेतक-यांची सर्व पीके पाण्याखाली गेल्याने येथील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे तात्काळ मदत दिली जाईल, असे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिले. भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहर व परिसरातील नुकसानग्रस्त भागांची मंत्री…

Read Full News

राजनंदिनी संस्थेतर्फे राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार सौ. कोकिळा पाटील यांना प्रदान 

हॅलो जनता, जळगाव (अनिल राठोड) : रोजी अल्पबचत भवन कलेक्टर ऑफिस जळगाव येथे मराठा सेवा संघ प्रणित वधू वर सूचक कक्ष च्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, वावडदा ता.जळगाव येथील रहिवासी सौ.कोकिळा सुमित पाटील यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे 2023-24 या वर्षाचा “राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार” नुकताच प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याप्रसंगी राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. संदीपा वाघ, शालिग्राम…

Read Full News
Jalgaon Agri

Jalgaon Agri : बोगस बियाणे संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला दिल्या “या” सूचना

हॅलो जनता (जळगाव) – Jalgaon Agri खरीप हंगामात बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यासोबतच जमिनीचा पोत वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने जनजागृतीवर भर देणे गरजेचे आहे. त्या साठी आवश्यक त्या उपाय योजना करणे गरजेचे असून जिल्हा बँक व राष्ट्रीय बँकानी किसान क्रेडिट कार्ड धारकांची संख्या वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात…

Read Full News

Jalgaon : महाराष्ट्रातील पहिला “अॅक्वाफेस्ट” जल पर्यटनमहोत्सव जळगावमध्ये सुरु

हॅलो जनता, जळगाव (Jalgaon) : पर्यटन हा आता उद्योगाचे रूप घेत आहे. राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरु आहेत. राज्यात किल्ले, जल स्रोत, लेण्या, वन मुबलक प्रमाणात आहेत. यासाठीच देशातील सर्व राज्याचा अभ्यास करून राज्यात नवे पर्यटन धोरण आणले आहे. याचाच भाग म्हणून जळगाव शहरातील मेहरूण तलावात जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी…

Read Full News

🔴ब्रेकिंग : सावद्यात शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार?

हॅलो जनता न्यूज, रावेर – पाचोरा भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. या निर्णयाचा प्रभाव परिसरातील इतर भागांवरही दिसू लागला असून, आता सावदा शहरातही शिंदे गटाची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. सावदा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील…

Read Full News

राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; जळगाव रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात

जळगाव  प्रतिनिधी : जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन आज बहिणाबाई उद्यानासमोरील परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शहराच्या पायाभूत विकासाच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे महत्त्वाच्या टप्प्याच्या रूपात पाहिले जात आहे. लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि अथक प्रयत्नांमुळे…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पाचोरा तालुक्यात पाऊस सुरूच; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा, दि. २८ – हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पाचोरा तालुक्यासह परिसरात शनिवारपासून (२७ सप्टेंबर) सुरू झालेला पाऊस रविवारी (२८ सप्टेंबर)ही कायम आहे. थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढत असून, शहर व परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या सततच्या पावसामुळे संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरातील नदी-नाले व…

Read Full News

Airoplane Crash : कझाकस्तानमध्ये भीषण विमान अपघात: ४२ जणांचा मृत्यू, पक्ष्यांच्या थवेने उडवली दुर्घटनेची ठिणगी

हॅलो जनता न्युज, बाकु कझाकस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सच्या एका विमानाला भीषण अपघात (Airoplane Crash) झाला आहे. या दुर्घटनेत विमानाचे अक्षरशः तुकडे झाले असून, आपत्कालीन मंत्रालयाच्या माहितीनुसार, विमानात ७० प्रवासी होते. सध्या उपलब्ध माहितीनुसार, किमान ३० जण मृत्यूमुखी पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार मृतांची संख्या ४२ पर्यंत पोहोचली आहे. अपघाताच्या आधी वैमानिकांनी आपत्कालीन लँडिंगची…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीत तिढा कायम, राष्ट्रवादीचा इतक्या जागांचा प्रस्ताव….

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील प्रमुख पक्ष भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी युती निश्चित करत निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. यासाठी जळगाव एमआयडीसी परिसरातील हॉटेल प्रेसीडेंट पार्क येथे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असले, तरी जागावाटपाबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे…

Read Full News

गौरी किशोर उशिर यांना दहावीत ९४.६० टक्क्यांनी नेत्रदीपक यश ; विविध संस्थांकडून गुणगौरव सोहळा.

नेरी ता. जामनेर : नेरी केंद्र शिक्षण प्रसारक को-ऑप. मंडळ लि. संचलित जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नेरी येथील गुणवंत विद्यार्थिनी गौरी किशोर उशिर हिने मार्च २०२६ मध्ये झालेल्या एस.एस.सी. परीक्षेत ९४.६० टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गौरीने…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION