राजनंदिनी संस्थेतर्फे राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार सौ. कोकिळा पाटील यांना प्रदान
हॅलो जनता, जळगाव (अनिल राठोड) : रोजी अल्पबचत भवन कलेक्टर ऑफिस जळगाव येथे मराठा सेवा संघ प्रणित वधू वर सूचक कक्ष च्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, वावडदा ता.जळगाव येथील रहिवासी सौ.कोकिळा सुमित पाटील यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे 2023-24 या वर्षाचा “राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार” नुकताच प्रदान करण्यात आला.
पुरस्कार सोहळ्याप्रसंगी राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. संदीपा वाघ, शालिग्राम मालकर, डॉ.महेंद्रजी काबरा, मीनाक्षी चव्हाण, डॉ. शैलेंद्र भनगे, युवराज पाटील, ज्ञानेश्वर वाघ, तुळशीराम इंगळे आदींची उपस्थिती होती. सौ.कोकिळा पाटील या मराठा कुणबी समाजातील वधू- वर संबंध जुळवण्याचे उत्कृष्ठ सामाजिक कार्य त्यांचे पती व मराठा कुणबी वधूवर परिचय ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुमित पाटील यांच्या साहाय्याने सतत करत असतात. विनाहुंडा विवाह संबंध जोडण्यासाठी, कमी खर्चात विवाह होण्यासाठी, समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. तसेच जनजागृती करीत असतात. सामाजिक कार्यात देखील त्या सतत पुढे असतात. या कार्यासाठीच त्यांना सदर पुरस्कार प्रदान करीत असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. सौ. कोकिळा सुमित पाटील यांना राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या