Headlines

सावखेडा बुद्रुक येथे “एक गाव एक देवी”, ३१ वर्षांची परंपरा कायम

हॅलो जनता न्यूज, सावखेडा ता रावेर- सावखेडा बुद्रुक येथे जय भवानी मित्र मंडळ १९९५ पासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करत आहे. या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गावात फक्त एकच सप्तशृंगी देवीची स्थापना केली जाते. त्यामुळे “एक गाव, एक देवी” या उपक्रमातून गावातील ऐक्य, भक्तिभाव आणि परंपरा यांचे दर्शन घडते. गेल्या ३१…

Read Full News

चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ; ७ किलोहून अधिक गांजासह तिघे जेरबंद.

चोपडा ( प्रतिनिधी ) : अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी प्रभावी कारवाई करत सुमारे ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, गांजासह वाहन, दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या…

Read Full News
AI in agriculture

AI in agriculture : कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेतकरी ॲप आणि पोर्टल लवकरच सुरू होणार

हॅलो जनता न्युज, मुंबई AI in agriculture : राज्यात कृषी क्षेत्र सध्या अनेक समस्यांमुळे चर्चेत आहे, ज्यात विविध घोटाळे आणि अनियमितता समाविष्ट आहेत. पीक विमा घोटाळा, हार्वेस्टर व इतर घोटाळ्यांमुळे कृषी क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच वेळी, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेतकरी ॲप आणि पोर्टल लवकरच सुरू होणार आहे. या ॲप आणि पोर्टलद्वारे…

Read Full News

पाचोरा पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षकपदी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती, तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : काही दिवसांपूर्वी पाचोरा बस स्थानक परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तडका फडकी बदली करून त्यांच्या जागी पाचोरा पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुभवी आणि विविध गुन्हे अन्वेषण विभागांमध्ये यशस्वी सेवा बजावलेले राहुलकुमार पवार यांची पाचोरा येथे पोलिस निरीक्षक म्हणून…

Read Full News

💥ब्रेकिंग : चाळीसगावात खतांची चढ्या दराने विक्री, शेतकऱ्यांची होतेय आर्थिक लूट

हॅलो जनता न्यूज, जळगाव – चाळीसगाव शहरात रासायनिक खतांचा काळाबाजार सुरू असून कृषी विभाग लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. २६६ रुपये मूळ किंमत असलेला युरिया ३०० ते ३५० रुपयांना देऊन शेतकरी लुबाडण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे आम्ही चढ्या भावाने खते विकतो असा कबुली जवाब देखील दुकानदार देत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे….

Read Full News
(MVA Jalgaon)

MVA Jalgaon : शरद पवारांच्या स्वागतावरून नाराजी नाट्य, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना डावलून दुसऱ्यांना संधी..

हॅलो जनता (जळगाव) – (MVA Jalgaon) आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा आणि मुक्ताईनगर या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता त्यांचं जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. मात्र त्या अगोदरच…

Read Full News

🚨पाचोरा ब्रेकिंग : निर्धार मेळाव्यात शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग, भाजप ठाकरे गटाला धक्का

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निर्धार मेळाव्यात आज शिंदे गटाच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होऊन राजकीय समीकरणात मोठी हालचाल पाहायला मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रवेशामुळे भडगाव-पाचोरा मतदारसंघात नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या मेळाव्याला…

Read Full News

💥 ब्रेकिंग : लोणावळा हादरले ! तरुणीचे अपहरण करून कारमध्ये तिघांचा अत्याचार, हात पाय बांधून केले दुष्कृत्य…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी | लोणावळ्यात एका २३ वर्षीय तरुणीचे २५ ते ३० वयोगटातील तीन जणांनी अपहरण करून तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून तो तरुणीच्या ओळखीतील आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार २५ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास ती लोणावळ्यातील नारायणीधाम मंदिराजवळील तुंगार्ली येथून एकटी पायी चालत जात असताना तीन अनोळखी तरुणांनी…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगाव पोलिसांची निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई, अनेक भावी नगरसेवकांचा समावेश

हॅलो जनता न्यूज, भडगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भडगाव पोलीस प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुका शांततेत, निष्पक्ष आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी पोलिसांनी व्यापक तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने शहर आणि तालुक्यातील उपद्रवी, गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ज्यांच्यावर…

Read Full News

बदामी (कर्नाटक) येथे राष्ट्रीय महासंमेलन उत्साहात संपन्न

भडगाव : बदामी (कर्नाटक) येथे राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठान, भारत यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय महासंमेलन दिनांक २५ व २६ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडले. देशभरातून मोठ्या संख्येने बांधव, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. या महासंमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत सरदार मा. सत्यजित दादा पाटणकर होते,…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION