🛑 पावसाचा हाहाकार : शिंदाड राजुरीसह अनेक गावांना फटका, रात्रीत शेकडो गुरे वाहून गेल्याची भीती…
हॅलो जनता न्यूज, जळगाव – मध्यरात्री डोंगर माथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा तालुक्यातील सातगाव परिसरासह शिंदाड व राजुरी गावांना मोठा फटका बसला आहे. रात्री अचानक आलेल्या पावसाच्या तडाख्यामुळे नदी-नाले तुफानी वाहू लागले आणि गावांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातगाव, शिंदाड, राजुरीसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये उभे असलेले कापूस, उडीद, सोयाबीन या पिकांचे मोठे…
