Kharif Hangam : रावेर तालुक्यात कापूस पिकाचे क्षेत्र घटणार, “हे” आहे कारण…..
हॅलो शेतकरी रावेर – शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक भाव न मिळाल्याने कापूस उत्पादनाचा खर्चही शेतकऱ्यांचा निघालेला नाही. गेल्या हंगामातील उत्पादन घेतलेला कापूस मातीमोल भावाने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यामुळे येत्या खरीप हंगामात रावेर तालुक्यात कापसाच्या लागवड क्षेत्रात सुमारे १३७० हेक्टरने घटण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
खरीप हंगामातील रावेर तालुक्यातील प्रमुख पीक हे कापूस आहे. दरवर्षी सुमारे १७ हजार हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाला योग्य दर मिळत नसल्याची स्थिती असून कापसाचे भाव वाढण्याच्या आशेने दोन हंगामातील कापूस शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवला होता. मात्र कापसाच्या दरात कोणतीही वाढ झाली नसल्याने तोट्यात कापसाची शेतकऱ्यांना विक्री करावी लागली होती.
Kharif Hangam : शासनाने चुकीचे धोरण राबविल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका…
शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून असताना शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते. कापसाची शासनाने कमी भावाने खरेदी करणे अपेक्षित असताना याकडे शासनाचे व लोकप्रतिनिधींचे सतत दुर्लक्ष झाले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात रावेर तालुक्यातील कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात सुमारे १३७० हेक्टर म्हणजेच ३५०० एकर क्षेत्र घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. ज्वारी व कडधान्याच्या लागवरीचे क्षेत्र यामुळे वाढणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या…
जामनेर बालिका अत्याचार आणि खून प्रकरणतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 10 पथके रवाना
अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदी या अधिकाऱ्याची वर्णी…