नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला आमदार मंगेश चव्हाण यांनी सपत्नीक घेतले आदिशक्ती पाटणादेवीचे दर्शन….
नवरात्र उत्सवानिमित्त आमदार मंगेश चव्हाण यांची देवीच्या चरणी अनोखी भेट

हॅलो जनता, (प्रमोद रुले) –
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला कुलदैवत आदिशक्ती पाटणादेवी येथे जावून आमदार मंगेश चव्हाण यांनी सपत्नीक दर्शन घेतले. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरवात होणार असून पाटणादेवीच्या मंदिरात नयनरम्य अशी सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या तयारीचा आढावा आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून घेण्यात आला. नवरात्र उत्सवाच्या काळात सर्व खान्देशवासियांनी संध्याकाळी ६ ते रात्री १० च्या दरम्यान पाटणादेवी येथे नक्की दर्शनाला यावे व पाटणाई परिसराच्या आगळ्यावेगळ्या रुपाची अनुभूती घ्यावी असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.
नवरात्र उत्सवात देवीच्या चरणी आमदार मंगेश चव्हाणांची अनोखी भेट….
आमदार मंगेश चव्हाण यांनी पाटणादेवी परिसराच्या वैविध्यपूर्ण विकासासाठी २० कोटी रुपयांचा निधी मिळवित तालुकावासियांना नवरात्रोत्सवाच्या पर्वणीवर अनोखी भेट दिली आहे. यामुळे या पुरातन तीर्थ व पर्यटनक्षेत्राचा कायापालट होणार आहे. खान्देशातील एक प्रमुख धार्मिक व पर्यटन क्षेत्र असा यास्थळाचा लौकीक असून तो अजून वाढणार आहे. पाटणादेवी हे चाळीसगाव तालुकावासियांचेच नव्हे तर अवघ्या खान्देशवासियांचेही कुलदैवत आहे. नवसाला पावणारी असे माता चंडिकेचे अधिष्ठान असून थोर गणितीतज्ञ भास्कराचार्य यांची ही तपोभूमी आहे.
पुराणकाळापासूनच या परिसराचे मोठे वैशिष्ट्ये राहिले आहे. निसर्ग व प्राणी, पक्षी संपदेने हा परिसर सुजलाम – सुफलाम आहे. येथे गणितनगरी साकारण्याची स्वप्ने काहींनी दाखवली. मात्र गणित नगरीच्या नावाने एक वीटही त्यांना ठेवता आली नाही. राजकारण मात्र १० वर्ष केले. ही वस्तूस्थिती असून गेल्या अनेक वर्षात पाटणादेवी तीर्थक्षेत्राचा शाश्वत विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच निधी मिळविण्यात आ. चव्हाण यशस्वी ठरले आहे. निधी मंजूर झाल्याने भाविकांसह पर्यटन, पर्यारवणप्रेमी व खगोल अभ्यासकांनी आनंद व्यक्त केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
Jalgaon : महाराष्ट्रातील पहिला “अॅक्वाफेस्ट” जल पर्यटनमहोत्सव जळगावमध्ये सुरु
Pachora : अनिल देशमुख यांची शिवसेना- उबाठा उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती
आम्हणा किशोर आप्पा मुळे आम्हले रामन दर्शन घडी रायन, अयोध्येला जाणाऱ्या यात्रेकरूंनी मानले आभार….