🛑 🌧️ महाराष्ट्रात १७ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, प्रशासन सतर्क, या जिल्ह्यांना इशारा…
हॅलो जनता न्यूज, मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. १३ ते १८ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील १७ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, प्रशासन सतर्क झाले आहे.
या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा…
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

🚨 अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना आवाहन
- नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्क राहावे.
- आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी तात्काळ स्थलांतर करावे.
- प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
- अनावश्यक प्रवास टाळावा व मुसळधार पावसाच्या वेळी घराबाहेर पडू नये.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क
राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली असून, स्थानिक प्रशासन, पथके व एनडीआरएफच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आधीच झालेल्या पावसामुळे काही भागात शेतीचे मोठे नुकसान झाले असून, नवीन पावसाच्या तडाख्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
🛑 एसीबीची कारवाई, पाचोऱ्यातील सहाय्यक महसूल अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात अटक
🛑 दुर्मीळ आजारांसाठी शासनाने स्वतंत्र धोरण आखावे, सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांची मागणी
🛑 ब्रेकिंग : पाचोरा भडगाव मतदार संघातील आणखी एक विरोधक भाजपच्या गळाला, आज मुंबई येथे प्रवेश सोहळा….




