Headlines

🚨 ब्रेकिंग : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर, कोणत्या जिल्ह्याला किती निधी पहा….

हॅलो जनता न्यूज, मुंबई : जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा देत एकूण रु. १३३९,४९,२५,००० (रूपये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी, एकोणपन्नास लक्ष, पंचवीस हजार फक्त) इतक्या निधीच्या वितरणास मंजुरी दिली आहे. शेतकरी मदत :…

Read Full News

🛑 बिग ब्रेकिंग : लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार, निवडणुका तीन टप्प्यांत?

हॅलो जनता न्यूज, मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोग तीन टप्प्यांत या निवडणुका घेण्याचा विचार करीत असून त्यानुसार प्राथमिक आराखडा तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका, दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात…

Read Full News
महाराष्ट्र राज्यपाल

🛑 ब्रेकिंग: महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची या नेत्याकडे, राजकीय चर्चांना उधाण..

हॅलो जनता न्यूज, नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर मोठी घडामोड झाली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. नवनियुक्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सी. पी. राधाकृष्णन यांची अलीकडेच देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याने त्यांनी महाराष्ट्र राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे…

Read Full News
महाराष्ट्रात १७ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, प्रशासन सतर्क, या जिल्ह्यांना इशारा.

🛑 🌧️ महाराष्ट्रात १७ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, प्रशासन सतर्क, या जिल्ह्यांना इशारा…

हॅलो जनता न्यूज, मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. १३ ते १८ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील १७ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, प्रशासन सतर्क झाले आहे. या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा… हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली,…

Read Full News

💥 ब्रेकिंग : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र स्टुडंट युनियन आक्रमक, सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी

हॅलो जनता न्यूज, जळगाव :- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे ही शिक्षण प्रशासनाची प्रथम जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियन तर्फे करण्यात आली असून या संदर्भातील निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र स्टुडंट युनियन : विद्यार्थिनींवर लैंगिक…

Read Full News

सामाजिक कार्यकर्ते सचिन धांडे यांची महाराष्ट्र राज्य अन्न आयोगावर नियुक्ती

हॅलो जनता, जळगाव : सामाजिक चळवळीत सक्रीय असलेले आणि आदिवासी, शेतकरी, वंचित घटकांच्या हक्कासाठी दीर्घ काळ संघर्ष करणारे सचिन धांडे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्य शासनाच्या निर्णयानुसार अन्न सुरक्षा अधिकार कायदा २०१३ अंतर्गत करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य अन्न आयोग हे राज्यातील गोरगरीब, भूमिहीन, भटकंती, स्थलांतरित…

Read Full News
बांधकाम व्यावसायिक

Bogus companies : महाराष्ट्र बोगस कंपन्यांमध्ये आघाडीवर तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर

हॅलो जनता, नवी दिल्ली : Bogus companies गेल्या पाच वर्षांत, रजिस्ट्रार ऑफ कंपनीजने (आरओसी) तब्बल २.३३ लाख बनावट कंपन्या बंद केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ३६,८५६ कंपन्या समाविष्ट असून, महाराष्ट्र या प्रकारात देशात आघाडीवर आहे. दिल्ली ३५,६३७ बोगस कंपन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गत पाच वर्षांत तब्बल २.३३,५६६ कंपन्यांना यादीतून वगळण्यात आले आहे. याची सुरुवात २०१९-२० मध्ये…

Read Full News

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मनपा सहाय्यक आयुक्तांवर कठोर कारवाईची मागणी….

हॅलो जनता न्युज, जळगाव जळगाव शहरातील लोक टाइम्स न्युज चे पत्रकार विक्रम कापडणे हे महानगर पालिकेत बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता यांचा कॅमेरा हिसकावून घेणे व त्यातील मेमरी कार्ड काढणे, दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून लोकशाहीचा आवाज दाबनाऱ्या…

Read Full News

ब्रेकिंग : राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता, फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजात महायुतीला “इतक्या” जागा मिळणार…

हॅलो जनता, मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाली. आज मंगळवारी महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर फलोदी सट्टाबाजारातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. यापूर्वी फलोदी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION