⁠हॅलो क्राईम

Beed Crime : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारी पोलिसांकडून समोर

हॅलो जनता न्युज, बीड :

बीड (Beed Crime) जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर राज्यात बीड केंद्रबिंदू बनला आहे. खंडणी प्रकरणात अटक केलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे. विरोधी पक्ष व स्थानिक नेत्यांनी बीडला ‘बिहार’ म्हणून संबोधलं आहे, आणि यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

त्याच पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी 2024 मध्ये जिल्ह्यात घडलेल्या गुन्हेगारीची आकडेवारी प्रकाशित केली आहे. या आकडेवारीनुसार, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये पोलिसांच्या कारवाईत सुधारणा दिसून आली आहे, परंतु हत्येच्या प्रयत्नांची संख्या वाढल्याचंही समोर आलं आहे.

Beed Crime : 2023 आणि 2024 मधील गुन्हेगारी आकडेवारीची तुलना:

खून : 2023 मध्ये बीड (Beed Crime) जिल्ह्यात एकूण 64 खूनाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 60 गुन्हे उघडण्यात आले. 2024 मध्ये मात्र 40 खूनांचे गुन्हे दाखल झाले आहेत, आणि सर्व खुनांचा तपास उघड केला गेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

खुनाचा प्रयत्न : 2023 मध्ये बीड (Beed Crime) जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न करणारे 165 गुन्हे दाखल झाले होते, ज्यामध्ये 164 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. 2024 मध्ये खुनाचा प्रयत्न करणारे 191 गुन्हे दाखल झाले आहेत, आणि यामध्ये 190 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. यावरून हत्येच्या प्रयत्नांची संख्या 2023 च्या तुलनेत वाढल्याचं स्पष्ट दिसत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon ZP : बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओंचे निर्देश…

E cabinet : महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई – कॅबीनेट’

Jalgaon Crime : लाच घेताना तलाठ्याला एसीबीने पकडले रंगेहाथ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button