हॅलो सामाजिक

🚨 ब्रेकिंग : गोसावी समाजाच्या निवेदनाची आमदारांकडून तत्काळ दखल…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) – पाचोरा येथील दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेची दुरुस्ती, स्वच्छता तसेच इतर उपयोगी व्यवस्था करण्यासंदर्भात आज पाचोरा तालुका दशनाम गोसावी समाजाच्या वतीने पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

गोसावी समाजाने निवेदन दिल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेऊन आमदार किशोर पाटील यांनी तात्काळ पाचोरा नगर पालिकाचे मुख्याअधिकारी मंगेश देवरे यांच्याशी फोनवर संवाद साधून, गोसावी समाजाचे स्मशान भूमीची जी काही समस्या आणि अडचणी असतील त्या ताबडतोब मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्मशान भूमीच्या कामासंदर्भात काहीही अडचणी किंवा समस्या असेल त्या पूर्णपणे मार्गी लावण्याचे आश्वासन गोसावी समाज बांधवाना दिले.

त्यास अनुसरू मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश देवरे यानी कर्मचारी वर्गास तात्काळ सूचना देऊन, स्मशान भूमी मधील घाण, कचरा, गवत, झाडेझुडपे यांची साफसफाई करण्यात आली. त्यानंतर उर्वरित इतर राहिलेली कामे देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे गोसावी समाज बांधवंनी आमदार व मुख्याधिकारी यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेतल्याने दोघांचे आभार मानले आहेत.

गोसावी समाज स्मशानभूमीच्या बाबतीत निवेदन देताना राघो गोसावी अंतूर्ली, दगडू गोसावी पोलीस पाटील वरखेडी, प्रकाश गोसावी, ऋषिकेश गोसावी, ज्ञानेश्वर गोसावी, गजानन गिरी, सुभाष गोसावी, नितीन गोसावी, कैलास गोसावी महंत यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या…

आई – बाप उमगले… अश्रूंचे बांध फुटले !

भडगाव नगरपरिषद विविध समित्यांच्या सभापती व सदस्यांची नियुक्ती जाहीर.

🛑 ब्रेकिंग : आखातवाडे येथील जयकुमार राजपूत यांची CRPF मध्ये निवड, शिवसेनेतर्फे सत्कार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button