हॅलो सामाजिक
हॅलो जनता न्यूज चॅनेलचे उपसंपादक गजानन गिरी यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती संपन्न

हॅलो जनता न्यूज पाचोरा: येथील प्रसिद्ध ‘आई येडेश्वरी मित्र मंडळ – मांगवाड्याची महाराणी’ दुर्गात्सवात हॅलो जनता न्यूज चॅनेलचे उपसंपादक गजानन गिरी यांनी सपत्नीक उपस्थित राहून देवीची मनोभावे महाआरती केली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या मंगल सोहळ्यात त्यांनी आदिमायेचे दर्शन घेऊन परिसरातील सुख, समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना केली.

याप्रसंगी मंडळाच्या वतीने गिरी दांपत्याचा सन्मान करण्यात आला. आरती सोहळ्याला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले.




