वार्ड क्रमांक १३ मधील रखडलेल्या विकासकामांना सुरुवात ; भूमिपूजन उत्साहात

पाचोरा तालुका प्रतिनिधी गजानन गिरी
पाचोरा : कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली व पाचोरा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाचोरा नगरपरिषद हद्दीतील वार्ड क्रमांक १३ मधील रखडलेल्या विकासकामांना अखेर सुरुवात झाली. या विकासकामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक रामशेठ केसवानी, माजी नगरसेविका सौ. मालती हटकर, माजी नगरसेवक बापू हटकर, आरोग्य सभापती तथा नगरसेवक सतीष तेडे यांच्यासह परिसरातील नागरिक व वार्डवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वार्ड क्रमांक १३ मधील प्रलंबित कामांना सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विकासकामांमुळे परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन नागरिकांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
यावेळी उपस्थित नागरिकांनी विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. भूमिपूजन कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




