हॅलो सामाजिक

पॅशन सॉफ्टवेअर आयोजित ‘गजर ५’ मधून ७०० विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाचे मार्गदर्शन.

तांत्रिक कौशल्य, प्रत्यक्ष सराव आणि प्रकल्प निर्मितीवर भर

जळगाव : जिल्हा पेठ, जयकिसनवाडी येथील पॅशन सॉफ्टवेअर येथे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांसाठी ‘गजर ५’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य, संगणक प्रोग्राम लेखन, प्रत्यक्ष सराव, प्रकल्प निर्मिती आणि भविष्यातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला जळगाव विमानतळाचे संचालक हर्ष त्रिपाठी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रसाद चौधरी, पॅशन सॉफ्टवेअरचे संचालक मनोज कुमावत आणि एच आर अपूर्वा कुमावत उपस्थित होते.

हर्ष त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांना विमानतळावरील औद्योगिक भेटीच्या अनुभवाच्या आधारे विमानतळावरील विविध विभाग, त्यांचे कार्य आणि विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची जळगाव विमानतळावरील औद्योगिक भेट यापूर्वीच पूर्ण झाली असल्याने त्या भेटीतील अनुभवांवरही चर्चा करण्यात आली.

प्रसाद चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार औद्योगिक प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. सैद्धांतिक ज्ञानासोबत प्रत्यक्ष कामाचा अनुभव विद्यार्थ्यांच्या तांत्रिक विकासासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

पॅशन सॉफ्टवेअरचे संचालक मनोज कुमावत यांनी १२ आठवड्यांच्या प्रशिक्षणातील विविध उपक्रम, तांत्रिक चाचण्या, संगणक प्रोग्राम लेखन, प्रत्यक्ष सराव आणि प्रकल्प स्पर्धेबाबत माहिती दिली. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील वाढत्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करण्याचे आवाहन केले.

औद्योगिक प्रशिक्षणार्थी शिवम माळी याने प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले. पॅशन सॉफ्टवेअरमध्ये कंपनीचे कामकाज, प्रकल्प कसे तयार केले जातात, संगणक प्रोग्राम लेखन आणि प्रत्यक्ष ज्ञानावर विशेष भर दिला जात असल्याने प्रशिक्षणाचा मोठा फायदा होत असल्याचे त्याने सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी सुराणा यांनी केले. आभार प्रदर्शन मनोज कुमावत यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button