हॅलो डॉक्टरहॅलो सामाजिक

कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कॅम्प ; २० केसेस पूर्ण.

हॅलो जनता प्रतिनिधी : कजगाव

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून १५ ऑगस्ट २०२६ रोजी कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पमध्ये एकूण २० कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, डिआरसीएचओ डॉ. रमेश धापते तसेच भडगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. रमेश धापते यांच्या हस्ते शस्त्रक्रिया कॅम्प पार पडला.

या कॅम्पमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. दिप्ती मगर, डॉ. प्रियंका पाटील, पर्यवेक्षक श्रीकांत मराठे, अजित राजगुडे, लॅब टेक्निशियन सौरभ अहिरे यांच्यासह जीएनएम, आरोग्य सेवक-सेविका, आशा सेविका, परिचर, पीटीए तसेच ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.

राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजनामुळे शस्त्रक्रिया कॅम्प यशस्वीरीत्या पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button