Headlines

🚨जळगाव ब्रेकिंग : युतीची बैठक अन् मंत्री गुलाबराव पाटील संतापात निघाले, नेमकं काय घडलं…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – आगामी जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाबाबत जळगाव शहरात शिवसेना–भाजपची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असली, तरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बैठकीनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे नाराज अवस्थेत बैठकीतून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. मात्र, महायुती भक्कम असून अंतिम निर्णयासाठी थोडा वेळ लागेल, असे स्पष्ट संकेत बैठकीनंतर देण्यात आले.

जळगाव : महायुती भक्कम आहे, मंत्री गिरीश महाजन…

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, “महायुती मजबूत आहे आणि येत्या दिवसांत ते सर्वांना दिसून येईल. जागा वाटपाचा प्रश्न तातडीने सोडवण्यापेक्षा समन्वयाने निर्णय घेणे अधिक योग्य आहे. घाई करून कोणालाही फायदा होणार नाही.”

महाजन यांनी पुढे स्पष्ट केले की, भाजप आणि शिवसेनेची स्वतंत्र बैठक अद्याप झालेली नसली, तरी दोन्ही पक्षांमध्ये सातत्याने संवाद सुरू आहे. “आमच्यात सध्या दोन-चार जागांवरून अंतर्गत घोळ सुरू आहे. तो आज रात्रीपर्यंत सुटेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मागील निवडणुकीत शिवसेनेकडे ५७ जागा होत्या. आता महायुतीत भाजपसह अन्य पक्षांना सामावून घेतल्यास आपल्या जागा कमी होतील, ही शिवसेनेतील एक महत्त्वाची चिंता असल्याचेही त्यांनी सूचित केले. तसेच, कुणाला तिकीट द्यायचे आणि कुणाला नाही, यावरून पक्षांतर्गत मतभेद सुरू असल्याचेही त्यांनी मान्य केले.

“निवडणूक महायुतीतूनच लढवली जाईल,” असा ठाम विश्वास व्यक्त करताना गिरीश महाजन म्हणाले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी आपले फोनवरून बोलणे झाले असून रात्रीपर्यंत सकारात्मक निर्णय होईल. तसेच, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतही महायुतीच्या अनुषंगाने चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जळगाव : रात्रीपर्यंत गुलाबराव पाटील खुश होतील..

दरम्यान, “गुलाबराव पाटील हे सध्या नाराज असले, तरी रात्रीपर्यंत ते समाधानी होतील,” असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. त्यामुळे जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाचा अंतिम निर्णय आज उशिरा किंवा येत्या एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

अमळनेर ब्रेकिंग : मंत्रिपदाच्या वल्गना करण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करा – माजी आमदार शिरीष चौधरी

आंचळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

जळगाव मनपा : प्रभाग क्रमांक ७ मधून महेश वर्मा यांच्या उमेदवारीची जनतेतून मागणी…

5,394Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION