⁠हॅलो क्राईम

🚨 ब्रेकिंग: नदीत वाहून गेलेल्या भावाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनी सापडला, तिरडीवरच शेवटची भाऊबीज

हॅलो जनता न्यूज, जळगाव – नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवी विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनंतर सापडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयुरेश्वर कॉलनीतील हेमंत संतोष पाटील (वय १८) हा तरुण देवी विसर्जनासाठी गिरणा नदीपात्रात उतरला होता. विसर्जनानंतर परत येताना त्याचा पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोलिस, ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी सलग वीस दिवस शोधमोहीम राबवली, मात्र त्याचा काहीच मागमूस लागला नव्हता. मात्र भाऊबीजेच्या दिवशीच (२४ ऑक्टोबर) दोनगाव शिवारात नदीकाठावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. गावकऱ्यांनी याची माहिती पोलीस पाटलांना दिली. पोलिस व पाटील कुटुंब घटनास्थळी पोहोचले असता, कपड्यांवरून ओळख पटली की तो मृतदेह हेमंतचाच आहे.

वडिलांचे सावली दोन वर्षांच्या वयातच हरवलेल्या हेमंतचे संगोपन त्याच्या आईने कष्टाने केले होते. आईने तीन मुलांना वाढवून उभं केलं, पण आता हेमंतच्या मृत्यूने पुन्हा एकदा या कुटुंबावर काळच कोसळला आहे. हेमंतला एक जुळा भाऊ आणि एक बहीण आहे. भाऊबीजेच्याच दिवशी भावाचा मृतदेह पाहून बहिणीने अश्रू ढाळत तिरडीवरच भावाची शेवटची ओवाळणी केली. हे हृदयद्रावक दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू दाटले.

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण मयुरेश्वर कॉलनी व दोनगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. दिवाळीसारख्या सणाच्या काळात पाटील कुटुंबावर कोसळलेलं हे दु:ख गावकऱ्यांच्या मनाला चटका लावून गेलं.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 ब्रेकिंग : ग्रामीण भागातही स्टार्टअप्सचा नवा युगारंभ, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

🚨 ब्रेकिंग : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण…

आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button