⁠हॅलो रोजगार

🚨 ब्रेकिंग : ग्रामीण भागातही स्टार्टअप्सचा नवा युगारंभ, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी) — महाराष्ट्र देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स असणारे राज्य असून आता ग्रामीण भागातील हजारो तरुणांना स्टार्टअप्सच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक घडविण्याचे लक्ष्य राज्य शासनाने ठरवले आहे, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकासदृष्टी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विभागाने नव्या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून, ग्रामीण भागातील तरुणांसाठी त्यात विशिष्ट कोटा राखण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील संस्था प्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय हिरक महोत्सव समिती सदस्य आणि आयएमसी सदस्यांचीही बैठक घेण्यात आली.

यावेळी धरणगाव येथील डॉ. हेडगेवार नगरमधील क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक स्मृती संस्था* आयोजित ‘मुकुंदराज पणशीकर कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता केंद्र’ या उपक्रमाचे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

 📜 कार्यक्रमातील महत्त्वाच्या घोषणा

१) प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान अंतर्गत टेलिकॉम एसएससीमार्फत पुढील अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार त्यात —

  • Telecom Customer Care Executive (Call Centre/Relationship)
  • Electronics/Mobile Phone Hardware Repair Technician
  • Digital Mitra – Multi Skill Technician (Electronic Home Appliances)

२) ‘दक्ष प्रकल्प’ अंतर्गत एससी, एसटी आणि महिलांसाठी विशेष Skill Program*राबविण्यात येणार.

३) महिलांसाठी स्वतंत्र कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र ‘DPC’ अंतर्गत नव्या नाविन्यपूर्ण योजनेची प्रक्रिया सुरु.

४) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना अंतर्गत या संस्थेतील दोन महिलांना प्रत्येकी ₹10 लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार.

५) मुख्यमंत्री उद्योजकता प्रोत्साहन कार्यक्रम अंतर्गत शिफारस केलेल्या उमेदवारांना ₹5 लाखांपर्यंत मदतीस प्राधान्य दिले जाणार.

शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा

  • राज्यातील ७५ हजार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन.
  • व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये नव्या उपक्रमांची अंमलबजावणी.
  • राज्यभरात एक हजार रोजगार मेळावे आयोजित करण्याचे नियोजन.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत ४९९ आयटीआय विद्यार्थी ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियानात सहभागी.

या सर्व उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील तरुण, महिला आणि उद्योजकांना नव्या संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्र ‘स्टार्टअप कॅपिटल ऑफ इंडिया’ बनविण्याचा संकल्प राज्य सरकारने पुन्हा दृढ केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 ब्रेकिंग : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण…

आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत..

🛑ब्रेकिंग: टोणगाव शिवारातील वृक्षतोडीवर कादिर खान यांचा खुलासा, “सर्व परवानग्या कायदेशीरपणे घेतल्या”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button