हॅलो जनता न्यूज, पाचोरा (जळगाव) : पाचोरा शहरात अवैधरित्या शस्त्रविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १८ तलवारी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीचे डाव उधळले गेल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
गुप्त माहितीवरून पाचोरा पोलिसांचा सापळा
दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारास ११ वाजता पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, माहिजी नाका परिसरात शस्त्र विक्रीसाठी तलवारी आणण्यात आल्या आहेत. त्यावर तातडीने कारवाई करत पोलिसांनी संशयित सोहेल शेख तय्युब शेख (वय २४, रा. स्मशानभुमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) यास ताब्यात घेतले.
पाचोरा पोलिसांची कारवाई : १८ तलवारी जप्त
चौकशीत त्याने कबुली दिली की, विक्रीसाठी आणलेल्या तलवारींपैकी काही आधीच विकल्या असून उरलेल्या १८ तलवारी (किंमत सुमारे ५४ हजार रुपये) त्याने लपवून ठेवल्या होत्या. त्या तलवारी पोलिसांनी हस्तगत केल्या.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गु.र. नं. ४६०/२०२५ नोंद करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, पो.उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पो.उपनिरीक्षक कैलास ठाकुर, पो.कॉ. संदीप राजपूत (ब.क्र. ९९०), पो.कॉ. जितेंद्र पाटील (ब.क्र. १६०९) आणि पो.कॉ. हरीष परदेशी यांनी सहभाग घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या…
🛑 जळगाव शेतकरी आंदोलन : ११ शेतकऱ्यांसह बच्चू कडू, उन्मेष पाटील यांच्यावर गुन्हा
विद्यापीठात व्यवस्थापन अध्ययन प्रशाळेतर्फे युवक जनजागृती शिबिराचे आयोजन…
🛑चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची ऐतिहासिक कामगिरी, जळगाव जिल्ह्यात प्रथम…
