हॅलो जनता न्यूज, पाचोरा : पाचोरा शहरात ईद मिलाद-उन-नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात व ऐक्याचे दर्शन घडवत साजरा करण्यात आला. पाचोरा शहरातील प्रमुख मार्गावरून मुस्लिम बांधवांनी आज दिमाखदार मिरवणूक काढली. या मिरवणुकीत विविध सामाजिक, धार्मिक संघटनांनी सहभाग घेतला.
मिरवणुकीचा मार्ग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गेला असता महाविकास आघाडीच्या वतीने फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून ऐक्य व बंधुभावाचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, उबाठा सेनेचे उध्दव मराठे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात, निनादणाऱ्या धार्मिक घोषणाबाजीमध्ये ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने फिरली. नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेत मिरवणुकीचे स्वागत केले. शांततेच्या मार्गाने मिरवणूक आठवडे बाजार परिसरात पोहोचल्यानंतर सांगता करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या….
🌾 शेतात सोलर पंप लावायचा आहे, लगेच करा अर्ज…
पाचोऱ्यात गणेशोत्सवाचा जल्लोष, आमदार किशोर पाटील यांचे बाप्पाला साकडे.
यावल शहर हादरले – सहा वर्षीय मुलाचा दुष्कर्मानंतर खून, मृतदेह पोत्यात आढळला
