⁠हॅलो शेतकरी

💥 ब्रेकिंग : पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा, प्रशासन ॲक्शन मोडवर….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा तहसीलदार कार्यालयातील लिपिक अमोल सुरेश भोई याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांऐवजी मित्रांसह विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग केल्याचा प्रकार चौकशीदरम्यान उघड झाला आहे. पाचोरा तहसीलदारांनी अनुदानाच्या रकमेची वसुली सुरु केल्यानंतर हे उघड झाले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी भोई याला तडकाफडकी निलंबित केले आहे.

असा आहे पाचोरा अनुदान घोटाळा…

नैसर्गिक आपत्ती निधीच्या वाटपात १ कोटी २० लाख १३ हजार ५१७ रुपयांचे ‘अपहारकांड’ अमोल भोईने घडवून आणला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर तहसीलदार विजयकुमार बनसोडे यांनी अनुदानाची रक्कम ज्यांच्या बैंक खात्यात जमा झाली आहे, त्या संबंधित २२५ जणांना नोटिसा बजावल्या आहेत.

पाचोरा अनुदान घोटाळा : तहसील प्रशासनाने १० जणांच्या बँक खात्याची ई-केवायसी लॉक

या नोटिसाद्वारे अनुदानाची रकम शासन तिजोरीत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तहसील प्रशासनाने १० जणांच्या बँक खात्याची ई-केवायसी लॉक केले आहे. त्यामुळे २२५ पैकी २१५ जणांना नोटिसा मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या भितीने तहसीलदार कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर संबंधित खातेधारक भोईचे मित्रांसह विद्यार्थी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाचोरा अनुदान घोटाळा
पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा, प्रशासन ॲक्शन मोडवर…

पाचोरा अनुदान घोटाळा : जिल्हाधिकारी तहसीलदार ॲक्शन मोडवर…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने मंजूर केलेली रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्याची तक्रार प्राप्त होताच तहसीलदार विजय बनसोडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित प्रकरणाची तत्काळ चौकशी केली. या चौकशीत तथ्य आढळल्यानंतर पाचोरा पोलिस स्थानकात संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तर या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ पाचोरा तहसील कार्यालयातील लिपिक अमोल भोई याचे तडकाफडकी निलंबन केले असून या प्रकरणात वसुली मोहीम जोरदार सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या…

💥विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभाग, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर संपन्न

शकुंतला जे. प्राथमिक विद्यालयात हस्ताक्षर कार्यशाळा उत्साहात संपन्न

💥 Maratha Arakshan : ईडब्ल्यूएस हेच मराठ्यांसाठी योग्य आरक्षण आहे, भाजपच्या मंत्र्याचे वक्तव्य…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button