हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्य शासनाने ‘लाडक्या बहिणी’ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा गळ टाकण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील तब्बल ९२ हजार ७३७ महिला लाभार्थ्यांची घराघरांत जाऊन पडताळणी होणार आहे. अंगणवाडी सेविकांकडून हा सर्वेक्षण उपक्रम राबविला जाणार असून, त्यातून दोनपेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या कुटुंबातील महिलांचा लाभ कापला जाण्याची शक्यता आहे.
तत्कालीन महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती. सुरुवातीच्या काळात निकषांची काटेकोर तपासणी न करता मोठ्या प्रमाणावर अर्ज मंजूर झाले. त्यामुळे योजनेचा आर्थिक भार राज्य शासनावर प्रचंड वाढला. हा भार आता असह्य होत असल्याने, तसेच योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने सखोल पडताळणीचे निर्देश दिले आहेत.
लाडक्या बहीण : पडताळणीचे प्रमुख निकष
1. एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिलांना लाभ देणे थांबविणे.
2. उत्पन्न, वास्तव आणि इतर वैयक्तिक माहितीची प्रत्यक्ष पडताळणी.
3. दस्तऐवज व कागदपत्रांच्या आधारे पात्रता निश्चित करणे.
लाडक्या बहीण योजना : प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी सुरू
अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन माहिती गोळा करतील. यादरम्यान ‘कोणाचा लाभ कापला जाईल’ यावरून अनेक ठिकाणी गृहकलह, हेवेदावे आणि दावेदारी निर्माण होण्याची शक्यता प्रशासनानेही व्यक्त केली आहे.
या निर्णयामुळे पात्रांना लाभ कायम राहील, मात्र अपात्र लाभार्थ्यांचा गळ घातला जाईल. शासनाच्या या कारवाईकडे जिल्ह्यातील सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, कारण पडताळणीच्या या मोहिमेनंतर हजारो महिलांचा आर्थिक आधार धोक्यात येऊ शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या….
💥ब्रेकिंग : जनादेशचोर आणि कफनचोरांचा मुद्दा रंगला; फडणवीस ठाकरे यांच्यात जुंपली
💥ब्रेकिंग : राज्यात पुन्हा पावसाचा जोर, “या” जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
💥ब्रेकिंग : जामनेरमध्ये मारहाणीत तरुणाचा मृत्यू, मारहाणीच्या घटनेने शहरात तणाव
