जागा वाटपाच्या गणितावर भाष्य करताना महाजन म्हणाले की, शिंदेसेनेशी प्राथमिक बोलणे झाले आहे. सुरुवातीला आम्ही त्यांना १५ जागांचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांची मागणी २५ जागांची आहे. सध्या ही चर्चा २० जागांच्या आसपास येऊन थांबली असून, रविवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल.
महायुती संदर्भात मंत्री महाजन नेमकं काय म्हणाले..
राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यावतीने आमदार अनिल पाटील यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांचे आणि माझे बोलणे अजून झालेले नाही. त्यांच्याशी चर्चेनंतर बघू, रविवारी दुपारपर्यंत बऱ्याच बाबी स्पष्ट होतील. मात्र एकीकडे मैत्री गिरीश महाजन अशा प्रकारचे वक्तव्य करत असून दुसरीकडे जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारी मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अनिल पाटील यांनी महायुती झाल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे जळगावच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे हे अद्यापही स्पष्ट नाही…त्यामुळे जळगाव सध्या तरी युती निश्चित असली मात्र महायुती अनिश्चित आहे असे एकंदर वातावरण समोर आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
भडगाव तालुक्यातील राजकारणाचे चाणक्य – युवराज आबा पाटील
🚨 ब्रेकिंग : पाचोरा तालुक्यात बिबट्याची दहशत; ऊस तोडणीदरम्यान तीन पिल्ले आढळली..
🚨 ब्रेकिंग : सामाजिक कार्यकर्त्या कोमल वाढे प्रभाग क्र. ६ मधून जळगाव मनपा निवडणुकीच्या रिंगणात
