हॅलो जनता न्यूज, भडगाव (यश पाटील): सततच्या पावसामुळे भडगाव शहरातील विविध कॉलनी तसेच ओपन स्पेसमध्ये सांडपाणी साचून दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. फुटलेल्या गटारी, नाले आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, डेंग्यू, मलेरिया, हिवताप अशा आजारांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात व्यापक स्वच्छता व डास प्रतिबंधक फवारणी मोहीम राबविण्याची मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
माजी नगरसेविका व शेतकरी संघ संचालिका योजना पाटील, अभिनव संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा पाटील, समन्वयिका मनिषा पाटील, तसेच सोनाली पाटील यांनी एकत्र येऊन मुख्याधिकारी रविंद्र लांडे, आस्थापना प्रमुख राहुल साळुंखे, शहर अभियंता अपूर्वा आगळे, आणि आरोग्य विभाग प्रमुख छोटू वैद्य यांना निवेदन दिले.
निवेदनात शहरातील ओपन स्पेसमधील साचलेले पाणी तातडीने काढून टाकावे, अनावश्यक काटेरी झुडपे व झाडे हटवावीत, नवीन पाईप लाइनचे खड्डे बुजवावेत, तुटलेल्या गटारी दुरुस्त कराव्यात आणि डास प्रतिबंधासाठी नियमित फवारणी करावी अशी मागणी करण्यात आली. मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत शहरात व्यापक स्वरूपात स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल तसेच सर्व समस्यांचे लवकरात लवकर निराकरण केले जाईल, असे आश्वासन दिले.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग : एकनाथ खडसेंच्या घरात चोरी, सीडी आणि पेनड्राईव्ह चोरीला
🔴 ब्रेकिंग : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर!
🚨 ब्रेकिंग : मंत्री छगन भुजबळ यांना छातीत दुखल्याने रुग्णालयात दाखल, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
