हॅलो सामाजिक

🔴 ब्रेकिंग : नशिराबाद ग्रामस्थांचा स्मार्ट मीटरला तिव्र विरोध; आंदोलनाचा इशारा

हॅलो जनता न्यूज, जळगाव : नशिराबाद गावात विज वितरण महामंडळामार्फत घराघरांत स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या निर्णयाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत असून, माजी सरपंच पंकज शामकांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे हा ठाम विरोध नोंदविला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्याबाबत कोणताही स्पष्ट आदेश किंवा निर्णय प्रसारित झालेला नाही. अशा परिस्थितीत जबरदस्तीने बसविण्यात येणारी ही यंत्रणा कायदेशीरदृष्ट्या शंकास्पद असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.

तसेच, अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर विज बिलामध्ये अनपेक्षित वाढ झाल्याचे उदाहरण पुढे आले असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. नशिराबाद हे शेतकरीप्रधान व हातावर पोट भरणाऱ्या सामान्य लोकांचे गाव असल्याने या निर्णयामुळे शेतकरी व कामगार वर्गावर अन्यायकारक भार पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले होते की, सामान्य नागरिकांच्या घरी स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जाणार नाहीत, हेही ग्रामस्थांनी निवेदनात अधोरेखित केले आहे.

नशिराबाद ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या

१) नशिराबाद गावात कोणत्याही कंत्राटदार कंपनीस किंवा संबंधित एजन्सीला स्मार्ट मीटर बसविण्याबाबत लेखी सूचना देण्यात याव्यात.

२) गावात लोकांचा स्पष्ट विरोध व जनजागृती न करता कोणताही प्रयत्न करण्यात येऊ नये.

नशिराबाद ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जर पुढील १५ दिवसांत योग्य ती कार्यवाही झाली नाही, तर येत्या १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नशिराबाद पोलीस स्टेशन समोर मोठे आंदोलन करण्यात येईल. त्या दिवशी प्रतिकात्मक स्वरूपात स्मार्ट मीटरची होळी करण्यात येईल. या सर्व घडामोडींसाठी विज वितरण महामंडळ जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. नशिराबाद ग्रामस्थांचा हा ठाम विरोध लक्षात घेता, पुढील काही दिवसांत प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🔴 ब्रेकिंग : गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ, सतर्कतेचा इशारा…

🚨 पाचोरा तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

🛑पाचोरा : नुकत्याच लोकार्पण झालेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पाण्यात, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button