💥ब्रेकिंग : पाचोरा-भडगाव मतदारसंघात राजकीय खळबळ; ठाकरे गटाच्या नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा-भडगाव मतदारसंघातील राजकारण सध्या चांगलेच तापले असून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या सध्या वाढताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार दिलीप वाघ यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निश्चितच पाचोरा भडगाव मतदार संघात भाजपची ताकद वाढली आहे.
आमचे यू ट्यूब चॅनेल –
तर दुसरीकडे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाच्या एक प्रमुख नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी यासंदर्भात चर्चा सुरू आहे. संबंधित नेत्या कोणत्याही अटी-शर्थीशिवाय पक्षात याव्यात, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. मात्र, संबंधित काही ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय प्रवेश न करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेश अंतिम टप्प्यात येऊनही सध्या तरी प्रश्नचिन्हाखाली आहे.
भाजप पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून प्रवेशाला जोरदार विरोध…
संभाव्य प्रवेश जरी जवळपास निश्चित मानला जात असला तरी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जोरदार विरोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या संभाव्य प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वीच राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाची भूमिका आणि भाजपचा पुढील डाव काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
💥ब्रेकिंग : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
💥ब्रेकिंग : लंपी आजाराचा प्रादुर्भाव: मधुकर ठाकूर यांची सायकलवर जनजागृती…
💥ब्रेकिंग : आमदारांचे बनावट लेटरहेड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, आरोपी भाजपचा पदाधिकारी…




