ब्रेकिंग: आगामी विधानसभेसाठी महायुतीने ९ जागा रिपाईला द्याव्या अन्यथा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा महायुतीला अल्टिमेटम…
विधानसभेत रिपाई आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढू शकतो, रामदास आठवले यांची माहिती...

हॅलो जनता (छत्रपती संभाजीनगर)
रिपाईमुळे लोकसभेत महायुतीच्या अनेक जागा निवडून आल्या आहेत. महायुतीला त्याचा फायदा झाला आहे त्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही राज्यात तिन्ही पक्षांच्या कोट्यातून तीन तीन जागा द्याव्यात अशी मागणी केंद्रीय राज्य समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी आज छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकार परिषदेत केली. त्यामधे मराठवाड्यात फुलंब्री, केज, कळंब आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम या जागांची मागणी केली असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुद्ध लेणी बचाव मोर्चा सात ऑक्टोबरला शहरात काढण्यात येणार आहे सर्व आंबेडकर अनुयायांनी मोर्चा शांततेत काढावा असे आपण आठवले यांनी केले बुद्ध लेणी परिसरातील एकाही वस्तूला धक्का लागणार नाही याची खबरदारी घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी मला दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही जागा वन विभागाची असून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत असेही त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेबांच्या हयातीत त्यांच्या संकल्पनेतील रिपाई अस्तित्वात आली असती तर बाबासाहेब देशाचे पंतप्रधान झाले असते त्यांना आणखी काही वर्ष आयुर्मान मिळाले पाहिजे होते अशा भावना रामदास आठवले यांनी व्यक्त केल्या.
प्रकाश आंबेडकर आणि मी दोघे एकत्र आले तर ऐक्य शक्य आहे. आम्ही दोघे एकत्र आलो तरच लोकांना देखील ऐक्य शक्य होईल असे वाटते. आमच्या दोघा मधील एक जण जरी आला नाही तर लोकांना ते पूर्ण वाटणार नाही. त्यामुळे त्यांनी आमच्या सोबत यावे असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. काँग्रेसमुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यास उशीर झाला आहे. काँग्रेस कुठलेही काम करण्यात विलंब करत असे, त्यामुळे मराठी भाषा अभिजात दर्जा पासून दूर राहिली असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या..
आमदार सुरेश भोळे यांनी भवानी मातेला जळगावकरांसाठी घातले साकडे, “ही” केली मागणी
सावधान ! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू, दुर्दैवी घटनेने हळहळ…..
भडगाव तालुक्यात सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या शेतकरी शिवसंवाद यात्रेला उदंड प्रतिसाद