मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच पत्रकारांना न्याय मिळेल – आमदार किशोर पाटील
दिवंगत पत्रकार प्रमोद सोनवणे यांच्या कुटुंबाला आमदार किशोर पाटील यांच्याकडून ५१ हजारांची आर्थिक मदत..
हॅलो जनता, प्रतिनिधी – पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पत्रकारांच्या अडचणी जाणून घेत शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या माध्यमातून झाला असून निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध मागण्या असतील त्या मंजूर होऊन पत्रकारांना देखील न्याय मिळेल, अशा आशावाद आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला आहे. आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना, पाचोरा तालुक्याच्या वतीने पत्रकारांना ट्रॅक सूट, घड्याळ आणि विमा वितरणाचा कार्यक्रम पाचोरा शहरातील समर्थ लॉन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार किशोर पाटील बोलत होते. त्यांच्या हस्ते पत्रकारांना ट्रॅक सूट घड्याळ आणि विम्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी भडगावचे दिवंगत पत्रकार प्रमोद सोनवणे यांचे काही महिन्यांपूर्वी अकाली निधन झाले होते. याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या कुटुंबाला 51 हजार रुपयाची आर्थिक मदत देऊ केली आहे. या मदतीमुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त आले आहे. या कार्यक्रमाला संघटनेचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी खानदेशी विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भुवनेश् दुसाने, जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, जिल्हाध्यक्ष नगराज पाटील, नवले साहेब यांच्यासह जिल्ह्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या..
ब्रेकिंग : नेपाळ अपघातातील मयत यात्रेकरूंचे मृतदेह घेवून अँब्युलन्स भुसावळ कडे रवाना ….
Vaishali Suryawanshi : पाचोऱ्यात सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी आक्रमक
Sanjay Raut : ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत उद्या पाचोरा दौऱ्यावर