मग समोर कुणालाही येवू द्या, दिलीप खोडपेंच्या भूमिकेवर मंत्री महाजन यांची प्रतिक्रिया

हॅलो जनता, जळगाव – गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्याला काय करायचे हे माहीत आहे. म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार मोठ्या मताधिक्याने येणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव शहरातील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत म्हटले आहे.
भाजपचे ३५ वर्षापासून निष्ठावान समर्थक दिलीप खोडपे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त करत बोलण्यास नकार दिला आहे. मात्र गेल्या सहा सात टर्म पासून आपल्या विरोधात अनेक जण लढा देऊन थकले, आता कोणालाही येऊ द्या,आणि गंमत बघा ,घोडा मैदान समोर आहे. निवडणूक संपल्यावर माझ्याशी बोला अशा प्रकारची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
मंत्री महाजनांनी गणपती बाप्पाला घातले साकडे…
यंदा गणेश उत्सव साठी नागरिकांच्या मधे मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. जनतेला सुखी ठेव दुष्काळ पडू देऊ नको अशी मागणी आपण बाप्पाच्या कडे केली असल्याच ही मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटल आहे. जळगाव शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देत असताना ढोल ताशांच्या गजरात मंत्री गिरीश महाजन यांना, कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहाचे खातर फेर धरण्याचा मोह मात्र आवरता आला नसल्याचे पाहायला मिळाले आहे
इतर महत्वाच्या बातम्या…
विद्यमान आमदारांनी मतदारसंघ भकास करण्याचे पाप केले आहे, सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांची टीका…
274 सुशिक्षित युवकांना मिळाला आधार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप…