ब्रेकिंग: शिंदे सेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर, जळगाव जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांना डच्चू….
हॅलो जनता न्युज, जळगाव –
शिंदेंच्या शिवसेना पक्षाने आज आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात राज्यातील ४५ तर जळगाव जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. मात्र यात दोन विद्यमान आमदारांना डच्चू देण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे.
शिवसेनेचे गेल्या निवडणुकीत चार आमदार निवडून आले होते. तर अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील शिवसेनेला पाठींबा दिला होता. मात्र २२ रोजी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी अधिकृतपणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश घेतला. या पार्श्वभूमिवर, आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात जळगावतील पाच मान्यवरांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेने जळगाव ग्रामीण मतदारसंघात पालकमंत्री गुलाबराव पाटील एरंडोलमधून विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल चिमणराव पाटील, पाचोरा भडगाव मतदार संघातून किशोर पाटील, चोपड्यातून प्रा. चंद्रकांत सोनवणे तर मुक्ताईनगरमधून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेने कोणताही धोका न पत्करता अपेक्षित उमेदवारांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
पंचनाम्याचे नाटक बंद करून ओला दुष्काळ जाहीर करा, वैशाली सुर्यवंशी मागणी…
Nivdnuk Aayog : अति उत्साही कार्यकर्त्यांनो सावधान ! अन्यथा होणार गुन्हा दाखल