🚨 ब्रेकिंग : महापालिका निवडणुकीचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात

हॅलो जनता न्यूज, मुंबई : राज्यातील महापालिकांची निवडणूक डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सर्व महापलिका आयुक्तांची ऑनलाइन बैठक घेतली. त्यात निवडणुकीसाठीची आमची तयारी असल्याचे बहुतेक आयुक्तांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिका निवडणुक : दुबार मतदारांचा काटेकोर शोध घ्या
मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीदेखील दक्षता घ्यावी. प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती आणि सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा. याशिवाय प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निर्दशनास आल्यास तक्रारींची वाट न पाहता स्वतःहून दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश वाघमारे यांनी आयुक्तांना दिले.
महापालिका निवडणुक : दुबारांची यादी प्रसिद्ध करा
दुबार मतदारांची यादी संबंधित महापालिकेने आपल्या सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर दोन स्टार (**) दर्शविण्यात आलेले आहेत. असा मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत त्यांना आवाहन करण्यात यावे. त्या मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा. अशा मतदाराने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही केंद्रावर मतदान करता येणार नाही, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग : भाजपाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना चौधरी यांनी बजावला मतदानाचा हक्क…
🔴चोपडा ब्रेकिंग : प्रभाग क्र ९ मध्ये जनतेच ठरलं राज्यात देवंद्र चोपड्यात नरेंद्र
🚨भडगाव ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांचा नगरपालिका निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का..




