VBA Jalgaon : ‘या’ कारणामुळे निवडणुकीपूर्वी जळगावतुन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने घेतली माघार
हॅलो जनता (जळगाव) – लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जळगावात वंचित बहुजन आघाडीला (VBA Jalgaon) झटका बसला असून जळगाव लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेतल्याचे स्पस्ट केले आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी भूमिका जाहीर केल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव लोकसभेतून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी जाहीर केली होती.
VBA Jalgaon : या कारणामुळे प्रफुल लोढा यांनी घेतली माघार
मात्र मतदार संघातली परिस्थिती लक्षात घेऊन आपला विजय होणार नाही त्यामुळे उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय घेतल्याचं प्रफुल लोढा यांनी स्पष्ट केले असून उमेदवारी मागे घेत असल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणे झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
आगामी काळात कोणाच्या पाठीशी उभ राहायचं कुणाच्या सोबत राहायचं याबद्दलची भूमिका स्पष्ट करणार असून कुणाचाही माझ्यावर दबाव नाही. कुणाच्या दबावाला मरेपर्यंत मी घाबरणारा नाही स्वतःच्या मनाने उमेदवारी घेतली आणि स्वतःच्या मनाने उमेदवारी मागे घेत असल्याचं प्रफुल लोढा यांनी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता आगामी काळात वंचित बहुजन आघाडीचा (VBA Jalgaon) उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.