Iffco Urea : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : इफको लाँच करणार नॅनो युरिया प्लस, शेतकऱ्यांना होणार फायदे
हॅलो शेतकरी | इफकोकडून (Iffco Urea) आगामी खरीप हंगामासाठी नवीन द्रवरूप नॅनो युरिया प्लसचे उत्पादन करण्यात येणार आहे. इफको लवकरच नायट्रोजनचे प्रमाण जास्त असलेला नॅनो युरिया प्लस लाँच करणार आहे. केंद्र सरकारने १६ एप्रिल रोजी अधिसूचना जारी करून पीक पोषक घटकांचे प्रमाण बदलले आहे. त्यानुसार, आता इफकोच्या नॅनो-युरियामध्ये वजनानुसार किमान 16 टक्के नायट्रोजन असणे आवश्यक आहे. त्यामुळे इफको कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी नॅनो युरियामध्ये वजनानुसार १ ते ५ टक्के दरम्यान नायट्रोजन असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना दिसून आला नाही.
येत्या ८ ते १० दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने खतांच्या प्रमाणाबाबत तीन वर्षांसाठी वैध असलेली वैशिष्ट्ये १६ एप्रिल रोजी अधिसूचित केली आहेत. यापूर्वी, २४ फेब्रुवारी २०२१ रोजी अशी अधिसूचना जारी केली गेली होती. युरियाच्या ४५ किलोच्या पारंपारिक बॅगमध्ये नायट्रोजनचं प्रमाण ४६ टक्के इतकं असते. त्यामुळे शेतकऱ्यांसह काही तज्ञांनी अत्यंत कमी नायट्रोजन असलेल्या नॅनो-युरियाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
नवीन नॅनो युरिया साठी शेतकऱ्यांना मोजावी लागणार इतकी किंमत
राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नॅनो-युरियाचा वापर केला नाही. तिथे शेतकऱ्यांच्या विरोधामुळं सक्तीने नॅनो युरियाची विक्री करावी लागली होती. त्यामुळे त्यात आता त्यात नायट्रोजनचे प्रमाण वाढवले गेले आहे. नॅनो युरिया प्लसची किंमत ५०० मिली बाटलीसाठी पूर्वीइतकीच २२५ रुपये असेल.
National congress : काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमजद पठाण यांची निवड