🛑 ब्रेकिंग: राहुरी पोलीस पोलिसांचा अनोखा उपक्रम, वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष उपक्रम

राहुरी पोलीस स्टेशनच्या ‘ऑपरेशन मुस्कान पार्ट-1’ अंतर्गत मागील दीड वर्षात आतापर्यंत 91 बेपत्ता मुलींची सुटका करण्यात आली असून, उर्वरित 11 मुलींचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हे घडू नयेत म्हणून ‘ऑपरेशन मुस्कान पार्ट-2’ अंतर्गत हे जागरूकता अभियान राबवले जात आहे.
या अभियानामध्ये तालुक्यातील विविध शाळांमध्ये मुलींचे अपहरण कशाप्रकारे होते आणि ते कसे टाळता येईल, तसेच सायबर गुन्हे आणि मोबाईलच्या गैरवापरावर विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले जात आहे. या गुन्हे प्रतिबंधक अभियानाचा भाग म्हणून, सात्रळ येथील कडू पाटील महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी रयत संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अरुण कडू पाटील, अक्षर मानव वाचनालयाचे संस्थापक श्री. पंकज कडू पाटील, प्राचार्य श्री. सीताराम गारुडकर, मुख्याध्यापिका सौ. विद्या ब्राह्मणे, पर्यवेक्षिका सौ. हेमलता साबळे, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
राहुरी : शंभर पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार
कार्यक्रमानंतर, वाचन प्रेरणा दिनानिमित्त शंभर पुस्तके वाचून विक्रमी नोंद करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. शिक्षिका अश्विनी जाधव (कडू) यांनी विद्यालयात राबवत असलेल्या वाचन प्रकल्पाची माहिती दिली. पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी त्यांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल संवाद साधत हितगूज केले.
राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने अशाच प्रकारे गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ‘मुस्कान-2’ अभियान राबवले जाणार आहे. सदरचे अभियान माननीय पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी मा. श्री. जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात राहुरी पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाद्वारे प्रभावीपणे राबवले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या व्यासपीठावरून केली “ही” मागणी
🚨 ब्रेकिंग : भाजप स्वबळावर निवडणुक लढविण्याच्या तयारीत, बैठकीत नेमकं काय घडलं…




