💥ब्रेकिंग : ताईंचे ठरलं ! “या” दिवशी होणार भाजपमध्ये प्रवेश, चर्चांना उधाण

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : पाचोरा-भडगाव मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी येत्या १९ ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील हे शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत वैशाली सूर्यवंशी यांनी राजकीय वाटचाल सुरू केली होती. “मी ठाकरे सेनेची एकनिष्ठ शिवसैनिक आहे, उद्धवसाहेबांना सोडून मी कधीही भाजपमध्ये जाणार नाही,” असे ठामपणे सांगणाऱ्या वैशाली ताईंचा हा अचानक झालेला निर्णय कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारसंघात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
वैशाली ताईंचा भाजप प्रवेश, ठाकरे सेनेला मोठा धक्का..
भाजपच्या संघटनेत पाचोरा-भडगाव मतदारसंघ बळकट करण्यासाठी हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषत: राष्ट्रवादी व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी भाजपकडे वळवण्यासाठी गिरीश महाजन यांची ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, वैशाली सूर्यवंशी यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय का घेतला, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, मतदारसंघातील राजकीय समीकरणे यामुळे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व विधानसभा निवडणुका लक्षात घेता, वैशाली सूर्यवंशी यांचा भाजप प्रवेश हा ठाकरे गटासाठी निश्चितच मोठा धक्का ठरणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥ब्रेकिंग : शाळेतून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलीचा भाऊ असल्याचा बनाव….
💥ब्रेकिंग : अवैध सट्टेबाजी ॲप प्रकरणात प्रसिद्ध क्रिकेटपटू ईडीच्या रडारवर
💥ब्रेकिंग : जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणीचे लाभ धोक्यात, पडताळणी सुरू पहा यादी…




