🚨 ब्रेकिंग : जळगाव मनपा निवडणूक, शिंदेसेनेची स्वबळाची तयारी सुरू…

महापालिका निवडणूक केव्हा जाहीर होणार हे स्पष्ट नाही; परंतु जळगाव शहरात राजकीय हालचालींना गती आली आहे. त्यादृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षातर्फे नियोजन देखील केले जात आहे. महायुती झाल्यास सुमारे २५० अन् महायुती न झाल्यास ४०० उमेदवार रिंगणात उतरतील असा अंदाज आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाला भारतीय
जळगाव मनपा : आम्ही लोकसभा विधानसभेत पूर्ण ताकदीने मदत केली
शिवसेनेतील १४ बंडखोर उमेदवारांना सोबत घेणार नसल्याचे भाजप सूत्रांकडून सांगितले जाते. जर बंडखोर निवडणुकीत सोबत चालणार नाही मग लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आमची मदत कशी काय चालली. शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण क्षमतेने निवडणुकीत राबले. भाजपला मिळालेल्या मताधिक्यामध्ये शिवसेनेचाही वाटा आहे, असा युक्तिवाद आता शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
जळगाव मनपा: आमचीही स्वबळाची तयारी सुरू – विष्णू भंगाळे…
शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महायुतीला प्राधान्य दिले आहे. सन्मानजनक जागा दिल्या तर सोबत राहू; परंतु भाजपकडून आमच्या उमेदवारांविषयी अटी, शर्ती घालणे योग्य होणार नाही. जर आमच्या उमेदवारांना विरोध होणार असेल तर आमचीही ७५ जागांची तयारी असल्याचे सांगितले.
जनता पक्षासोबत युती होईल अशी आशा आहे; परंतु भारतीय जनता पक्ष नेत्यांकडून एकीकडे महायुतीचा दावा केला जात आहे अन् दुसरीकडे शिंदे गटाच्या विरोधात उमेदवार तयार केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात आम्ही देखील भाजपच्या या रणनीतीबाबत अवगत असून, सतर्क असल्याचे शिंदे गटातील इच्छुकांकडून सांगितले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
ब्रेकिंग : पाचोरा पोलीस ॲक्शन मोडवर, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई सुरू
ब्रेकिंग : मुस्लिम मतांचे गणित : चोपडा शहरात शिवसेना शिंदे गटाची मोठी खेळी यशस्वी होणार का?




