हॅलो सामाजिक

💥ब्रेकिंग : सुख-समृद्धीसाठी प्रताप पाटील यांनी घातले कानबाई मातेला साकडे…!

हॅलो जनता न्यूज,📍पाळधी (ता. धरणगाव)

खान्देशातील श्रद्धा, भक्ती आणि पारंपरिक उत्साह यांचे प्रतीक असलेल्या कानबाई उत्सवाची सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी पाळधी गावात भक्तिमय वातावरणात विसर्जन मिरवणुकीसह सांगता झाली. पारंपरिक वाद्यांच्या सुरावटी, डीजेच्या तालावर रंगलेले नृत्य, आणि महिलांच्या फुगड्यांनी गावातील वातावरण संगीतमय व रंगीबेरंगी झाले होते.

प्रताप पाटील यांचे कानबाई मातेपुढे साकडे..

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मा. प्रताप पाटील यांनी कानबाई मातेचे दर्शन घेतले आणि खानदेशवासीयांना सुख, समृद्धी आणि यश लाभावे यासाठी साकडे घातले. त्यांच्यासोबत उद्योजक संजय खैरनार, उद्योजिका नूतन खैरनार, पत्रकार भूषण महाजन हेही आपापल्या कुटुंबियांसह उपस्थित होते.

कानबाई उत्सव : पारंपरिक थाटात उत्सवाची सांगता

कानबाई मातेची स्थापना नागपंचमीच्या नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी केली जाते, आणि त्यानंतर सोमवारी विसर्जन मिरवणूक काढली जाते. यावर्षीही पाळधी येथे उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक थाटात साजरा करण्यात आला. अहिराणी गीते, भजन-कीर्तन, फुगडी, नृत्य, जागरण, आणि विशेष रोट (पुरणपोळी) या खास खान्देशी परंपरा यावेळी पाहायला मिळाल्या.

कानबाई महोत्सव : खान्देशाचा महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा

जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कानबाई उत्सव अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो. कानबाई (राधिका) आणि रानबाई (रुक्मिणी/चंद्रावली) या श्रीकृष्णाच्या सख्या मानल्या जाणाऱ्या देवतांची पूजा केली जाते. स्त्रिया देवतेशी मैत्रीभावाने संवाद साधत, संतती, सुख-समृद्धी आणि संकट निवारणासाठी प्रार्थना करतात.

कानबाई महोत्सव : महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

उत्सवात महिलांचा सहभाग लक्षणीय असतो. त्यांचा नृत्य, फुगडी, भजन, आणि एकत्र येण्याचा भावनिक अनुभव यामुळे सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होते. मौखिक परंपरा, लोककथा, आणि घराघरातील भक्तिभाव यामुळे हा उत्सव खान्देशी संस्कृतीच्या जपणुकीचा जीवंत वारसा ठरतो.

🪔 भाऊबंदकी आणि एकत्रतेचा कानबाई उत्सव

कानबाईच्या निमित्ताने अनेक नातेसंबंध एकत्र येतात. गावकऱ्यांत, कुटुंबांत आणि नात्यांमध्ये भाऊबंदकी, ऐक्य, आणि प्रेम वाढते. आधुनिकतेच्या वावटळीतही हा उत्सव आपल्या संस्कृतीचे मोलाचे दर्शन घडवतो.

इतर महत्त्वाच्या बातम्या….

💥ब्रेकिंग : पाचोरा-भडगाव मतदारसंघात राजकीय खळबळ; ठाकरे गटाच्या नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

💥ब्रेकिंग : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

💥ब्रेकिंग : लंपी आजाराचा प्रादुर्भाव: मधुकर ठाकूर यांची सायकलवर जनजागृती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button