हॅलो राजकारण

🚨पाचोरा ब्रेकिंग : निर्धार मेळाव्यात शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग, भाजप ठाकरे गटाला धक्का

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निर्धार मेळाव्यात आज शिंदे गटाच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होऊन राजकीय समीकरणात मोठी हालचाल पाहायला मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रवेशामुळे भडगाव-पाचोरा मतदारसंघात नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या मेळाव्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच आमदार किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या मंचावरच भाजपमधील माजी नगरसेवक ॲड. योगेश पाटील (दादू वकील) तसेच भडगाव शहरातील शिवसेना (ठाकरे गट) चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचा पक्ष प्रवेश पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते झाला.

दरम्यान, भडगाव शहरातील ठाकरे गटातील माजी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये या नव्या प्रवेशामुळे शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून आमदार किशोर पाटील यांनी पुन्हा एकदा आपला जनाधार सिद्ध केला असल्याचे चित्र संपूर्ण परिसरात दिसून आले.

इतर महत्वाच्या बातम्या…

भाजपला मोठा धक्का! निर्धार मेळाव्यात यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश होणार…

🔴 ब्रेकिंग : ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पणन महासंघाला तब्बल १०० कोटी रुपयांचा विक्रमी नफा – रोहित निकम

🚨 ब्रेकिंग : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे एकावन्न लाखांचा धनादेश

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button