MVA Jalgaon : पाचोऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी, आजच्या बैठकीला काँग्रेस अनूपस्थित
हॅलो जनता प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली असून महायुती आणि महाविकास आघाडी कडून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्याचा सपाटा सुरू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पाचोऱ्यातील स्वामी लॉन येथे पाचोरा भडगाव मतदासंघांचा महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मात्र या मेळाव्यात काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित नसणार आहेत. तसा मॅसेज हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना समाज माध्यांमांवर प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी म्हणाले की, महाविकास आघाडीचा मेळावा हा आज पाचोऱ्यात आयोजित करणार असल्याची माहिती आयोजकांकडून खूप उशिरा मिळाली त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना तयारी करण्यासाठी वेळच मिळाला नाही. कुठेतरी काँग्रेसला महत्व दिले जात नसल्याने काही प्रमाणत त्यांनी नाराजी व्यक्त करत आजच्या मेळाव्याला काँग्रेसचे पदाधिकारी जाणार नसून वरिष्ठांनी पुढील तारीख दिल्याची माहिती हॅलो जनता वृत्तसंस्थेला दिली आहे.
MVA Jalgaon : पाचोरा भडगाव मतदार संघात काँग्रेसची मोठी ताकद
पाचोरा भडगाव मतदार संघात काँग्रेसला मानणारा एक मोठा गट आहे. मात्र महाविकास आघाडीकडून जर काँग्रेसला डावलले गेले तर याचा मोठा फटका आगामी काळात महाविकास आघाडीच्या उमेदवारास बसण्याची दाट शक्यता ही राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
ST Ticket Rates Increase : एसटीचे तिकीट दर १० टक्क्यांनी वाढणार