हॅलो डॉक्टर

💥 धक्कादायक : जिल्ह्यात तब्बल ८६ बोगस डॉक्टर, बोगस डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ…

हॅलो जनता न्यूज, नाशिक : जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा प्रश्न गंभीर बनला असून, गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ८६ बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई केली आहे. यापैकी ३२ जणांवर पोलिसांत एफआयआर दाखल केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इगतपुरी शहारत ही संख्या सर्वाधिक ३६ आहे. तालुक्यातील शिरसाठे येथे सहा महिन्यांपूर्वी एक बोगस डॉक्टर आढळल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा धुमाकूळ, चक्क दवाखाने थाटले

ग्रामीण भागातच बोगस डॉक्टरांचा धुमाकूळ अधिक असून, मागील वर्षी ३२ बोगस डॉक्टर आढळले होते. परंतु, यंदा ही संख्या ८६ वर पोहोचली आहे. ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागात वैद्यकीय पदवी नसलेले हे बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याने लोकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक १८ गुन्हे नोंदवले गेले, तर नांदगाव (पाच), सुरगाणा (चार) व अन्य काही तालुक्यांतही असे प्रकार आढळले आहेत. मात्र, नाशिक, देवळा, दिंडोरी, निफाड, त्र्यंबकेश्वर, चांदवड या तालुक्यांत एकही बोगस डॉक्टर नसल्याची नोंद आहे. मात्र. ती संशयास्पद असल्याचे बोलले जाते.

प्रशासनाकडून कारवाईत दिरंगाई का? नागरिकांच्या मनात प्रश्न चिन्ह…

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, या समित्यांकडून कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. आरोग्य विभागाकडून तक्रारींचा अभाव असल्याचे कारण देत बोगस डॉक्टरांना अभय दिले जात असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी मुक्कामी नसल्याने स्थानिकांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसत आहे. प्रशिक्षित आणि अनुभवी डॉक्टर खेड्यापाड्यांत सेवा देण्यास तयार नसल्यानेच या बोगस डॉक्टरांचे फावत असून, त्यामुळेच ही संख्या वाढत आहे.

बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा अधिकार तालुका आरोग्याधिकाऱ्यास..

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल १९६१ नुसार, वैद्यकीय सेवा देण्यासाठी नोंदणी बंधनकारक आहे. मात्र, बोगस डॉक्टरांकडे आरएमपी (रजिस्टर मेडिकल प्रैक्टिस) प्रमाणपत्र नसते, तरीही ते दवाखान्यांत उपचार करतात. ग्रामीण आणि आदिवासी भागात अशा डॉक्टरांचे प्रमाणपत्रच गावकऱ्यांना वैद्यकीय पदवी वाटते, ज्याचा गैरफायदा घेतला जातो. बोगस डॉक्टरांवर कारवाईचा अधिकार तालुका आरोग्याधिकाऱ्यांना आहे. तक्रार मिळाल्यास नोंदणी नसलेल्या डॉक्टरांना नोटीस देऊन दवाखाना बंद करण्याचे आदेश दिले जातात. बंद न केल्यास गुन्हा दाखल होतो असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या….

💥 ब्रेकिंग : रोहिणी खडसेंची ‘त्या’ महिलेविरुद्ध पोलिसात तक्रार, न्यायालयात दाद मागणार.

रोहित निकम यांच्या पाठपुराव्याला यश, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा..

शिंदेच्या आमदाराची पुन्हा जीभ घसरली, संभाजीराजे आणि शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button