हॅलो सामाजिक⁠हॅलो शेतकरी

🛑 भडगावात पूरस्थितीचे सावट; प्रशासनाकडून ‘रेड अलर्ट’ जारी

हॅलो जनता न्यूज, भडगाव – तालुक्यात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शहरातून वाहणारा कोल्हा नाला धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने आसपासच्या सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील लहान-मोठे नदी-नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने अत्यावश्यक काम वगळता घराबाहेर न पडण्याचा कडक इशारा दिला आहे. तसेच, नागरिकांना आपले पशुधन सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आणि नदी-नाल्यांच्या काठावर पाणी पाहण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचे नुकसान, धोकादायक स्थिती किंवा दुर्घटना घडल्यास तात्काळ प्रशासनाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, नागरिकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. ‘सुरक्षितता प्रथम’ या संदेशासह प्रशासनाने नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आणि प्रशासनाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🛑 पाचोरा तालुक्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा, गावांमध्ये पाणी शिरल्याने संपर्क तुटला.

🛑 भुसावळ : नात्याला काळीमा फासणारी घटना, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…

🚨 सावदा शहरात जोरदार पाऊस; बाजारपेठेत पाणी साचल्याने नागरिक हैराण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button