⁠हॅलो क्राईम

💥 ब्रेकिंग: जळगाव पोलिसांचा फार्महाऊस वर छापा, धक्कादायक वास्तव समोर…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरालगत असलेल्या ममुराबाद गावाजवळ एका फार्म हाऊसवर आज पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात बनावट ट्रेडिंग कॉल सेंटर चा पर्दाफाश करत लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. बनावट एमसीएक्स ट्रेडिंग कॉल सेंटर अवैध पद्धतीने सुरू असून या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरानजीक ममुराबाद रस्त्यावर एका व्यक्तीच्या मालकीच्या फार्म हाऊसमध्ये एमसीएक्स ट्रेडिंग नावाने अवैध कॉल सेंटर सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत स्थानिक गुन्हे शाखा, तालुका पोलिस व विशेष पथकाने संयुक्त कारवाई करत छापा टाकला. यात काही कॉम्प्युटर, मोबाईल फोन व अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये नक्की कोणत्या प्रकारचे अवैध आर्थिक व्यवहार सुरू होते, किती जण सहभागी होते आणि जिल्ह्यातील आणखी कुठे अशा प्रकारचे ट्रेडिंग सेंटर कार्यरत आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, तालुका पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्यासह पथकाने छापेमारी केली. दरम्यान, या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून लोकांमध्ये या ‘ट्रेडिंग कॉल सेंटर’ प्रकरणाबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या पुढील चौकशीमध्ये या प्रकरणाचा मोठा आर्थिक घोटाळा उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

💥 ब्रेकिंग: मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जाणार का? फडणवीसांचे वक्तव्य चर्चेत

💥 ब्रेकिंग : गिरणा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

💥 ब्रेकिंग : गिरणा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button