Headlines

दुष्काळ जाहीर ; आता पंचनामे आणि मदतीच्या अंमलबजावणीची परीक्षा !

जळगांव : खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना राज्य शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू केला आहे. यामध्ये जळगांव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांचा समावेश आहे. एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि यावल हे तालुके…

Read Full News

🚨 पाचोरा तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा/भडगाव : पाचोरा व भडगाव तालुक्यात आज पुन्हा रात्रीच्या दहाच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, नागरिक व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर शेती, घरे व जनावरांचे नुकसान झाले होते. त्यात भर म्हणून आज पुन्हा सुरू झालेल्या पावसाने हाहाकार उडाला…

Read Full News

मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी, शेतकऱ्यांना म्हणाले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा तालुक्यातील नेरी,चिंचखेडा गावात व परिसरात अतिवृष्टीमुळे घरे व शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल. असा विश्वास राज्याचे जलसंपदा ,आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. जामनेर तालुक्यातील नेरी गावातील भोरटक्के नगर, इंदिरानगर, बाजार पट्टा तर पाचोरा तालुक्यातील शिंदाड, सातगाव या गावातील  अतिवृष्टी झालेल्या भागाची…

Read Full News

🛑पाचोरा नुकसान : अजूनही गावांमध्ये मदतकार्य सुरू, प्रचंड नुकसान अन् रडणारे चेहरे…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) – तालुक्यातील शिंदाड, राजुरी, निंभोरे, वानेगाव, वाडी शेवाळे यासह परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठा पूर आला. डोंगर माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्याने गावांमध्ये शिरकाव करत घरांचे, शेतीचे तसेच गुराढोरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली असून घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत…

Read Full News

Cotton Farming : एकीकडे पाऊस तर दुसरीकडे व्यापारी, कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात…

हॅलो जनता प्रतिनिधी – (जळगाव) गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चार हजार हेक्टर पेक्षा अधिक शेतीचे जिल्ह्यात नुकसान झालेला आहे. यात सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. ऐन कापूस वेचणीवर आला असताना मुसळधार पावसामुळे कापूस पिकाला (Cotton Farming)…

Read Full News

पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतांची आमदार किशोर पाटील यांनी बांधावर जावून केली पाहणी, शेतकऱ्यांनी….

हॅलो जनता (पाचोरा) – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे कुरंगी, सामनेर यासह इतर गावांमध्ये केळी सह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेकडो हेक्टर वरील केळी ही जमीनदोस्त झाली असून लिंबू, मोसंबी यासह इतर फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION