हॅलो सामाजिक

🚨पाचोरा तालुक्यातील पूरग्रस्तांना आमदार किशोर पाटील यांच्या वतीने दिलासा….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा│ तालुक्यातील शिंदाड, राजुरी, निंभोरा, वाणेगाव आदी गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. गावातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या गुरांचा जीव गेला तर शेतीतील उभ्या पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांकडे घरात अन्नाचा एक दाना देखील उरला नव्हता.

या कठीण प्रसंगी आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देण्यात आला. आमदार पाटील यांचे सुपुत्र सुमित किशोर आप्पा पाटील यांनी स्वतः प्रत्येक गावात जाऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली व अन्नधान्य व किराणा किटचे वाटप केले. या मदतीमुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

🚨पाचोरा तालुक्यातील पूरग्रस्तांना आमदार किशोर पाटील यांच्या वतीने दिलासा....
🚨पाचोरा तालुक्यातील पूरग्रस्तांना आमदार किशोर पाटील यांच्या वतीने दिलासा….

पूरग्रस्तांनी यावेळी आपल्या व्यथा सुमित पाटील यांच्यासमोर मांडल्या. “घरात अन्नाचा एक दाना देखील शिल्लक नाही. अवकाळी पावसामुळे आमच्या घरातील साठा वाहून गेला, तर शेतातील पिकेही पूर्णपणे उध्वस्त झाली. तुम्ही केलेल्या या मदतीमुळे आम्हाला जगण्याचा आधार मिळाला,” अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.

या मदत कार्यामुळे पूरग्रस्त नागरिकांत नवसंजीवनी निर्माण झाली असून गावात कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जात आहे.आमदार किशोर पाटील यांच्या वतीने करण्यात आलेले मदत कार्य हे पूरग्रस्तांसाठी मोठा आधार ठरले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨लाडकी बहीण योजना : तत्काळ इ केवायसी करा अन्यथा योजनेचा लाभ बंद होणार….

🌾 ब्रेकिंग : ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ३० सप्टेंबरपर्यंत ज्वारी खरेदीस मुदतवाढ

🚨 ब्रेकिंग : पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई : १८ तलवारी जप्त, अवैध विक्रीचा डाव उधळला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button