🚨 ब्रेकिंग : मत चोरीविरोधात जळगावात काँग्रेसच्या स्वाक्षरी अभियानाला सुरूवात

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. २५ : जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसची बैठक जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी “वोट चोर गद्दी छोड़” नारा देत मत चोरीविरोधात स्वाक्षरी अभियानास सुरुवात करण्यात आली.
प्रदेश युवक काँग्रेसच्या सूचनेनुसार आयोजित या बैठकीत जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस समन्वयक अंकुश देशमुख, प्रदेश महासचिव किरण पाटील, सचिव तुषार संदानशिव, जिल्हाध्यक्ष महेश पाटील, सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाध्यक्ष पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत युवकांना संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच मत चोरीबाबत जनजागृती करण्यासाठी घराघरात जावे, असे आवाहनही त्यांनी केले.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी स्वाक्षरी करून केली अभियानाला सुरूवात…
यानंतर स्वाक्षरी मोहिमेला जिल्हाध्यक्ष पवार यांनी स्वाक्षरी करून सुरुवात केली. फुले मार्केट परिसरात पदाधिकाऱ्यांनी दुकानदार व नागरिकांशी संवाद साधून मत चोरीबाबत जागृती केली. या वेळी मनोज चौधरी, सलमान तडवी, शुभम शिंदे, असद सय्यद, मनोहर महाले, सुदर्शन इंगळे, लखन पाटील, धनंजय शिंदे, गोविंद देशमुख, अमोल देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर, कोणत्या जिल्ह्याला किती निधी पहा….
🚨मंत्री सावकारे गावात गेले अन् शेतकऱ्यांनी… प्रचंड नुकसान
🛑 ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम : मुख्याधिकारी मंगेश देवरे उतरले रस्त्यावर




