हॅलो जनता न्यूज, चोपडा – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज चोपडा शहरात भाजपतर्फे अभूतपूर्व असा शक्तीप्रदर्शनाचा महापूर पाहायला मिळाला. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत शहरातील महत्त्वाच्या भागातून भव्य रॅली काढण्यात आली. नागरिकांचा उस्फूर्त सहभाग आणि उत्साही प्रतिसाद यामुळे संपूर्ण शहरात निवडणुकीचे वातावरण तापले.
चोपडा शहरातील प्रमुख भागातून रॅलीची धडाकेबाज वाटचाल
रक्षा खडसे: “चोपड्यात भाजपचा विजय निश्चित”
रॅलीदरम्यान नागरिकांच्या प्रतिसादाने प्रभावित झालेल्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,“चोपडा शहरातील जनतेचा उत्साह पाहता भाजपची विजयाची घोडदौड निश्चित आहे. आमच्या उमेदवारांबद्दल नागरिकांचा विश्वास स्पष्टपणे दिसत आहे.”
यावेळी त्यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना चौधरी यांच्याबद्दल विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की,“साधना चौधरी या उच्चशिक्षित असून चौधरी कुटुंबाचा सामाजिक व राजकीय वारसा चोपडा शहराच्या विकासात निश्चितच मोलाचे योगदान देईल. शहराच्या प्रगतीला गती देण्यासाठी योग्य नेतृत्वाची निवड आवश्यक असून साधना ताई त्या दृष्टीने योग्य पर्याय आहेत.”
चोपड्यात भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला
रॅलीदरम्यान पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार, महिला मोर्चा, युवक मोर्चा तसेच विविध सेलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहून कार्यकर्त्यांचा जोश अधिक वाढला असून पुढील काही दिवसांत प्रचार आणखी आक्रमक पद्धतीने राबविण्याची माहिती भाजपकडून देण्यात आली. नगरपरिषद निवडणुकीसाठी फक्त काही दिवस शिल्लक असताना चोपड्यात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या या महाशक्तीप्रदर्शनामुळे इतर पक्षांच्या गणितात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरातील मतदार आगामी निवडणुकीत कोणाच्या बाजूने कौल देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…..
🚨चोपडा ब्रेकिंग : म्हणून काँग्रेस सोबत युती केली, आमदार चंद्रकांत सोनवणे याचा खुलासा…
