हॅलो राजकारण

🔴 पाचोरा ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांची महत्वपूर्ण पत्रकार परिषद, जनतेला केले आवाहन…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : आज पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात आमदार किशोर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या ‘निर्धार मेळाव्या’त सर्व शिवसैनिक, कार्यकर्ते व मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

आमदार पाटील म्हणाले की, “पाचोरा-भडगाव मतदारसंघातील सर्व मतदार बंधू-भगिनी दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतात. मात्र, यावर्षीचा माझा वाढदिवस हा माझ्यासाठी खास आणि आगळावेगळा ठरणार आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये मी महाराष्ट्रातील पहिला आमदार आहे ज्याने शिवसेना या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा केल्यानंतर माझा हा पहिलाच वाढदिवस आहे आणि त्याचे औचित्य साधून मी ‘निर्धार मेळावा’ आयोजित केला आहे.”

हा निर्धार मेळावा एक नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर लोढाया जीन मैदानावर होणार असून, या मेळाव्याला मतदारसंघातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

पाचोरा : नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांवर फडकवण्याचा जनतेचा निर्धार ..

पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, “जेव्हा मी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पक्षाचे सर्व पदाधिकारी माझ्या सोबत होते. मात्र, हा निर्णय आता माझा एकट्याचा नाही, तो आपल्या सर्वांच्या निर्धारातून दृढ व्हायला हवा. शिवसेनेचा भगवा झेंडा नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांवर फडकवण्याचा आमचा निर्धार आहे.”“एक नोव्हेंबरचा मेळावा हा असा व्हावा की, संपूर्ण जिल्ह्याने पाहावे — आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा सर्वत्र फडकणार आहे! हा मेळावा शिवसैनिकांच्या एकतेचा आणि निर्धाराचा पुरावा ठरणार आहे.”

इतर महत्वाच्या बातम्या…

🔴 पाचोरा ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम : रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

🔴 पाचोरा ब्रेकिंग : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक संपन्न…

🔴 ब्रेकिंग : लाचप्रकरणी वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांसह दोन अटकेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button