आषाढी एकादशी निमित्त भडगाव खालची पेठ ते हरेश्वर पिंपळगाव पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन.
हॅलो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांची परंपरा जपत आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात विठ्ठल भक्तीचा संदेश घराघरांत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्रीक्षेत्र भडगाव खालची पेठ ते श्रीक्षेत्र हरेश्वर पिंपळगाव या मार्गावर प्रथमच पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधून दि. २३ व २४ जुलै २०२६ रोजी हा भक्तिमय सोहळा…
